ZP Laptop Anudan Yojana Maharashtra 2025 : सर्वांना नमस्कार, बदलत्या काळानुसार शिक्षणक्षेत्रामध्ये डिजिटल साधनांची आवश्यकता निर्माण झाली आहे. विशेषतः वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये ऑनलाइन नोट्स, ई-लर्निंग प्लॅटफॉर्म, व्हर्च्युअल प्रयोगशाळा, आणि विविध कोडिंग किंवा मेडिकल सॉफ्टवेअर वापरणे अत्यावश्यक झाले आहे. ही योजना केवळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदतच करत नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षणात प्रगती करण्याची संधी देखील निर्माण करून देत आहे.

लॅपटॉप अनुदान योजनेसाठी सेस फंडातून तरतूद
या योजनेमुळे हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठीही ते सज्ज होतील. बऱ्याच वेळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक घेण्यासाठी पैसे नसतात अशावेळी जिल्हापरिषद सेस फंडातून लॅपटॉपसाठी अनुदान देते.
जिल्हा परिषद सेस फंडातून 20 टक्के मागासवर्गीय कल्याण निधीमधून हि योजना राबविली जाते. अनेक जिल्हापरिषदांमध्ये हि योजनेतून लाभ दिला जात असला तरी सध्या मात्र हिंगोली जिल्हा परिषदेच्या वतीने लॅपटॉप अनुदान योजनेसाठी अर्ज सुरु झालेले आहेत.
योजनेचे नाव. | लॅपटॉप अनुदान योजना 2025. |
विभागाचे नाव. | समाज कल्याण. |
योजनेसाठी मिळणारे अनुदान. | जास्तीत जास्त 30 हजार रुपये. |
लाभार्थी पात्रता. | अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय विद्यार्थी. |
अर्ज सादरीकरण | ऑफलाईन |
कोठे सादर करावा | पंचायत समिती गट विकास अधिकारी किंवा समाज कल्याण ऑफिस. |
लॅपटॉप अनुदान योजना 2025 अर्ज सादर करण्याचा कालावधी
जिल्हा परिषद लॅपटॉप अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची शेवटची तारीख हि २५ जून होती. त्यांतर मात्र या योजनेस मुदतवाढ देण्यात आली असून आता नवीन तारीख ३१ जुलै २०२५ हि नवीन तारीख देण्यात आलेली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील पात्र विद्यार्थिनी लवकरात लवकर म्हणजेच ३१ जुलै २०२५ च्या आत त्यांचे अर्ज सादर करावे जेणे करून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. लॅपटॉप अनुदान योजनेचा प्रस्ताव तालुक्यातील पंचायत समिती येथे किंवा जिल्ह्यातील समाज कल्याण विभागात मिळणार आहे.
योजनेचे लाभार्थी कोण?
लॅपटॉप अनुदान योजनेचा लाभ खालील प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना मिळेल:
- अनुसूचित जाती (SC)
- अनुसूचित जमाती (ST)
- विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT)
- इतर मागासवर्ग (OBC)
ओपन प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज करू नयेत.योजनेचा लाभ घेण्यासाठी सगळ्यात महत्वाचे म्हणजे तो विद्यार्थी हिंगोली जिल्ह्यातील अराहीवासी असणे महत्वाचे आहे.
जिल्हा परिषद हिंगोली laptop अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थांना विहित नमुन्यातील प्रस्ताव पंचायत समिती, गट विकास अधिकारी किंवा हिंगोली येथील जिल्हा समाज कल्याण यांच्याकडे त्यांचे पूर्ण भरलेले प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे.
आवश्यक कागदपत्रे कोणती?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
- लॅपटॉप खरेदीचे मूळ बिल.
- आधार कार्डची झेरॉक्स प्रत.
- जातीचा दाखला.
- सध्या शिक्षण घेत असल्याचे प्रमाणपत्र/बोनाफाईड.
- बँक पासबुक झेरॉक्स.
इत्यादी कागदपत्रे या प्रस्तावासोबत जोडवी लगणार आहेत. प्रस्तावासोबत इतरही कागदपत्रे जोडावी लागणार आहेत. पंचायत समिती किंवा समाज कल्याण विभाग येथून तुम्ही हा प्रस्ताव मिळवू शकता.अधिक माहिती पाहा
योजनेच्या आवश्यक अटी खालीलप्रमाणे
अर्जदार विद्यार्थी हा ग्रामीण भागातील रहिवासी असावा.
विद्यार्थी वैद्यकीय / अभियांत्रिकी / इतर पदवी / पदव्युत्तर शिक्षण घेत असावा.
लॅपटॉप खरेदी नंतरच प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.
प्रस्तावासोबत लॅपटॉप खरेदीचे मूळ खरेदी बील जोडणे बंधनकारक आहे.
विद्यार्थ्यांनी आपला प्रस्ताव कार्यालयीन वेळेत गट विकास अधिकारी, पंचायत समिती किंवा जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद हिंगोली येथे सादर करावा.
लॅपटॉपसाठी अनुदानाचे स्वरूप
विद्यार्थ्यांनी लॅपटॉप खरेदी करण्यापूर्वी पंचायत समिती, गट विकास अधिकारी किंवा जिल्हा समाज कल्याण कार्यालय येथे सविस्तर माहिती जाणून घ्यावी आणि त्यानंतरच लॅपटॉप खरेदी करावा.
लॅपटॉपसाठी जास्तीत जास्त ३० हजार रुपये अनुदान मिळणार आहे. समजा विद्यार्थ्याने जर २६ हजार रुपयांचा लॅपटॉप खरेदी केला तर बिलानुसार २६ हजार रुपये अनुदान मिळेल.
मात्र या ऐवजी ३५ हजार रुपयांचा लॅपटॉप खरेदी केला तर केवळ ३० हजार रुपयेच मिळणार आहे कारण या योजनेसाठी अनुदानाची कमाल मर्यादा हि ३० हजार रुपये एवढी आहे.
30 हजार रुपये किमतीच्या आत मिळणारे लॅपटॉप
तुम्ही जर या योजनेसाठी पात्र झालात तर लॅपटॉप खरेदी करण्यापूर्वी कोणकोणते लॅपटॉप ३० हजार रुपयांच्या आत आहेत या संदर्भात ऑनलाईन इ कॉमर्स वेबसाईटवर चेक करू शकता.
उदारणार्थ खाली काही लॅपटॉपच्या किमती दिलेल्या आहेत त्या किमतीनुसार तुम्ही लॅपटॉप खरेदी करू शकता.
क्रमांक | ब्रँड व मॉडेल | वैशिष्ट्ये | किंमत (₹) | उपयुक्तता |
---|---|---|---|---|
1 | Lenovo IdeaPad Slim 3 | Intel i3, 8GB RAM, 256GB SSD | 29,990 | ऑनलाईन क्लासेस, प्रोग्रामिंग |
2 | HP 15s | Intel Pentium, 8GB RAM, 512GB SSD | 28,500 | शैक्षणिक वापर, ऑफिस काम |
3 | ASUS VivoBook 14 | Ryzen 3, 8GB RAM, 256GB SSD | 29,000 | शिकणे, कंटेंट बघणे |
4 | Acer Extensa 15 | i3, 4GB RAM, 1TB HDD | 27,990 | दैनंदिन अभ्यास, डॉक्युमेंट्स |
5 | Infinix Inbook X1 | i3, 8GB RAM, 256GB SSD | 28,999 | ऑनलाईन शिक्षण, बेसिक काम |
वरती दिलेल्या लॅपटॉपच्या किमतीमध्ये की किंवा जास्त असा फरक असू शकतो हे फक्त उदाहरणार्थ दिलेले आहे.
लॅपटॉप खरेदी करतांना घ्यावयाची काळजी
कुठेतरी योजना बघितली म्हणजे लगेच खरेदी करू नका. लॅपटॉप खरेदी करण्याअगोदर तुमच्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील अधिकारी यांच्याकडून माहिती घ्या.
लॅपटॉप चांगल्या कंपनीचा आहे का ते बघा कारण मोठ्या brand च्या नावाखाली कमी गुणवत्तेचे माल देण्याचे अनेक उदारणे आहेत.
त्यामुळे तुम्हाला ज्या कंपनीचा लॅपटॉप हवा आहे आणि जे configuration हवे आहे ते असल्यावरच खरेदी करा.
लॅपटॉप खरेदी केल्यावर पक्के बिल घ्या जेणे करून अनुदान मिळविण्यासाठी तुम्हाला कोणतही अडचण येणार नाही.
लॅपटॉप योजनेचे DBT पद्धतीने होणार अनुदान जमा
Direct benefit transfer अर्थात DBT पद्धतीने विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत. काय आहे हि DBT पद्धत.
या पद्धतीने लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले जातात. यामुळे मध्यस्थ किंवा दलालांना कोणतेही पैसे देण्याची गरज भासत नाही.
अर्जदाराला योजनेचा लाभ घेण्यासाठी कोठेही फेऱ्या मारण्याची गरज पडत नाही, DBT मुळे थेट पैसे बँक खात्यात जमा होतात.
DBT ही प्रणाली गरीब, गरजू आणि मागासवर्गीय घटकांसाठी योजनांचा लाभ निश्चित व पारदर्शक पद्धतीने पोहोचवण्याचे प्रभावी साधन ठरत आहे.
या संदर्भात हिंगोली जिल्हा परिषदेच्या फेसबुक पेजवर अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे. माहिती वाचण्यासाठी :- येथे क्लिक करा.
बातमी/ जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा.
लॅपटॉप अनुदान योजना 2025 काय आहे?
ग्रामीण व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषद हिंगोलीने ही योजना सुरू केली आहे. योजने अंतर्गत, पात्र विद्यार्थ्यांना लॅपटॉप खरेदीसाठी कमाल ₹30,000 पर्यंतचे थेट बँक अनुदान (DBT) दिले जाते.
लॅपटॉप योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?
या योजनेचा लाभ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, विमुक्त जाती व इतर मागासवर्गातील ग्रामीण भागातील वैद्यकीय, अभियांत्रिकी किंवा तत्सम उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी घेऊ शकतात.
योजनेअंतर्गत किती रुपये मिळतात?
पात्र विद्यार्थ्यांनी लॅपटॉप खरेदी केल्यानंतर मूळ बील सादर केल्यास खरेदी किमतीप्रमाणे, पण कमाल ₹30,000 पर्यंतचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते.
अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
हिंगोली लॅपटॉप अनुदान योजना 2025 साठी अंतिम मुदत 31 जुलै 2025 आहे. ही मुदत पूर्वी 25 जून होती, परंतु आता ती वाढवण्यात आली आहे.
अर्ज कुठे व कसा करायचा?
विद्यार्थ्यांनी लॅपटॉप खरेदी करून त्याचे मूळ बील, आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव गट विकास अधिकारी, पंचायत समिती किंवा जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद हिंगोली यांच्याकडे प्रत्यक्ष सादर करावा.
ZP Laptop Anudan Yojana Maharashtra 2025 अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
आधार कार्ड.
जात प्रमाणपत्र.
शिक्षण घेत असल्याचे प्रमाणपत्र.
लॅपटॉप खरेदीचे मूळ बील.
बँक पासबुक झेरॉक्स.